ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यात प्रश्नपत्रिका ही व्हॉट्सअॅपवरून वाटप करण्यात आली आहे. त्यादृष्टीने नागपुरातून अटक केलेल्या त्या तिघांचे मोबाइल फोनही महत्त्वाचे असताना ते मात्र अद्यापही ठाणे पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. यावरून ते मोबाइल गेले कुठे, असाच सवाल पोलिसांकडून उपस्थित केला जाऊ लागला. त्यांचे मोबाइल मिळाल्यास आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी अटक केलेल्या २१ जणांची कोठडी ८ मार्चपर्यंत वाढवली आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ तिघांचे मोबाइल फोन गेले कुठे?
By admin | Updated: March 5, 2017 00:46 IST