Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूविषयी जनजागृतीची पोस्टर्स लावलीत कुठे?

By admin | Updated: November 20, 2014 01:06 IST

पालिकेने वर्षभरात ९० लाख किमतीची पोस्टर्स छापली़ पालिकेच्या मालकीचे मुद्रणालय असतानाही खासगी कंपनीलाच दोन वेळा कंत्राट दिले़ मात्र ही पोस्टर्स शहरात कुठेही दिसून आली नाहीत़

मुंबई : डेंग्यूच्या जनजागृतीसाठी पालिकेने वर्षभरात ९० लाख किमतीची पोस्टर्स छापली़ पालिकेच्या मालकीचे मुद्रणालय असतानाही खासगी कंपनीलाच दोन वेळा कंत्राट दिले़ मात्र ही पोस्टर्स शहरात कुठेही दिसून आली नाहीत़ त्यामुळे डेंग्यूची भीती दाखवून पैसे कमविण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी सुरू केला काय, असा हल्लाच मनसेने स्थायी समितीमध्ये आज चढविला़डेंग्यूच्या डासांचा अड्डा घरात साठविलेल्या पाण्यातच सापडत असल्याने पालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली़ या मोहिमेंतर्गत वर्षभरात दोन वेळा पोस्टर्स छापून घेतली. ज्यात कोणती काळजी घ्यावी, आजाराची लक्षणे, उपचार याबाबत माहिती दिली आहे़ मात्र एका पोस्टर्सची किंमत १२ रुपये असताना पालिकेने खासगी छापखान्याला प्रति पोस्टर्स २० रुपये दिले़ मुद्रणालयातील लोकांना काम न देताना खासगी ठेकेदारालाच दोन वेळा कंत्राट दिले़ त्यामुळे यात काळेबेरे असल्याचा संशय मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायीच्या बैठकीत आज व्यक्त केला़ (प्रतिनिधी)