Join us  

सीएनजी तरी कुठे स्वस्त?; मागील काही महिन्यांमध्ये दरात मोठ्या प्रमाणात होतेय वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:07 AM

२०२१ च्या सुरुवातीला ४७ रुपये किलो या दराने मिळणारी सीएनजी आता ६६ रुपये किलो या दराने मिळत आहे.

मुंबई : पेट्रोलडिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यामुळे ग्राहकांचा सीएनजी गाड्या घेण्याकडे ओढा वाढत आहे. सीएनजी हे पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त मिळते. तसेच गाडी मायलेजदेखील चांगला देत असल्याने अनेक पेट्रोल गाड्यांच्या मालकांनी आपल्या गाडीत सीएनजी टाकी बसवून घेतली आहे. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सीएनजीदेखील महाग होणार आहे का, असा प्रश्न पडला आहे. २०२१ च्या सुरुवातीला ४७ रुपये किलो या दराने मिळणारी सीएनजी आता ६६ रुपये किलो या दराने मिळत आहे.

महिना    पेट्रोल    डिझेल    सीएनजी    (लिटर)    (लिटर)    (किलो) जानेवारी       ९२.८६          ८३.३०    ४७.९०फेब्रुवारी.      ९७.३४         ८८.४४.        ४७.९०मार्च.            ९६.९८.         ८७.९६.         ४७.९०एप्रिल.          ९६.८३.         ८७.८१.     ४९.४०मे.                १००.४७.      ९२.४५.         ४९.४०जून.             १०४.९०.       ९६.७२.         ४९.४०जुलै.            १०७.८३     ९७.४५      ५१.९८ऑगस्ट.        १०७.८३    ९७.४५.        ५४.५७सप्टेंबर.        १०७.४७.   ९७.२१.        ५४.५७ऑक्टोबर.     १०८.२९.    ९७.२१.        ५७.५४नोव्हेंबर        ११५.४७.   ९४.१४.         ६१.५०डिसेंबर         १०९.९६.    ९४.१४.        ६३.५०

सीएनजीही पेट्रोलच्या मार्गावर-

सीएनजी पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत स्वस्त आहे. प्रदूषणदेखील कमी होत असल्याने मी सीएनजी गाडी वापरत आहे. मात्र, सीएनजीदेखील महाग होत असेल तर सीएनजी गाड्या वापरून काहीच फायदा होणार नाही. सीएनजीचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. - चेतन पाटील

पेट्रोल डिझेल सीएनजी-

सीएनजी गाडी पेट्रोल, डिझेल गाडीपेक्षा महाग मिळते. सीएनजीसाठी रांगेत उभे राहावे लागते. या सगळ्या गोष्टी करून सीएनजी महाग होत असेल तर ग्राहक पुन्हा पेट्रोल, डिझेल गाड्या खरेदी करण्याकडे वळतील. सीएनजी जवळपास २० रुपयांनी महागल्याने गाडीचा इंधन खर्च वाढला आहे. - विनीत भोईर

टॅग्स :पेट्रोलडिझेल