Join us  

होमिओपॅथीचे उपचार होत आहेत यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:16 PM

डॉ जसवंत पाटील यांच्या आयुर्वेदाच्या प्रयत्नांना यश

मुंबई : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना जिथे अ‍ॅलोपॅथी काम करीत नाही, तिथे होमिओपॅथी लागू पडते, यावर विश्वास ठेवून डॉ जसवंत पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यशाची वाट दिसली.  आयुष मंत्रालय दिल्ली यंनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये कोरोना कोविड -१९च्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अर्सेनिक अल्बम ३० च्या औषधांचा वापर केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे नमुद केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने कोविड-१९ वर आयुर्वेद, होमिओपॅथी शाखेतील उपचारांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा स्वरुपाचे संशोधन करण्यास केंद्राकडून मान्यता दिली असून नॅशनल ट्रायल्ससाठी डॉ जसवंत पाटील यांना अधिकृतरीत्या निमंत्रित केले आहे.ज्येष्ठ होमिओपॅथी व अलोपॅथीतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांनी  होमिओपॅथीतील रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी ठराविक औषधाचा पाठपुरावा केला. विविध रुग्णांवर  होमिओपॅथीच्या गोळ्यांचे उपचार करून त्यांचा ऑब्सर्व्हेशनल स्टडी करण्यात आला. त्याचे अतिशय चांगले निकाल दिसले व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले. या उपचाराविषयी  केंद्र शासनाच्या सेंट्रल काऊन्सिल ऑफ होमिओपॅथी यांना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कळविले होते. दरम्यान या सगळ्याच्या क्लिनिकल ट्रायल्ससाठी वेळ नसल्याने रुग्णांवरील निकाल पाहून आयुष मंत्रालयाकडून होमिओपॅथी, आयुर्वेदाच्या उपचाराला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली.सद्यपरिस्थितीत १० लाख अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे मोफत वितरण रोहा या कंपनीच्या सहाय्याने डॉ पाटील मुंबईत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घनदाट वस्ती असलेल्या मुंबईच्या वस्त्यात या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. अनेक एनजीओ ही स्वताहून पुढाकार घेऊन याचे वाटप करत आहे इतकच नाही तर त्या होमिओपॅथीच्या दुकानात उपलब्ध होत असल्याची माहिती डॉ पाटील यांनी दिली. डॉ पाटील याना आयुष मंत्रालयाकडून नॅशनल्स ट्रायल्ससाठी बोलावणे आल्यानंतर आता आणखी सूक्ष्म संशोधनासाठी वाव मिळणार आहे. यामध्ये रेड झोनसाठी काय औषधे असू शकतात ? ऑरेंज झोनसाठी काय औषधे असू शकतात यावर संशोधनाला वाव असल्याची माहिती डॉ पाटील यांनी दिली.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या