Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांसमाेर प्रश्नचिन्हलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू हाेणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम ...

विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांसमाेर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू हाेणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी नववी ते बारावीच्या वर्गासाठी ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या त्याच लागू असणार असल्याचे आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशांप्रमाणे त्यांच्या पुढील सूचना येईपर्यंत मुंबईतील शाळा बंद राहणार असल्याने या शाळा कधी सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.

* विद्यार्थीसंख्या वाढेल अशी अपेक्षा

२३ नोव्हेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत, ही समाधानाची बाब आहे. पालक व शाळा यांमधील समन्वयामुळे हे शक्य झाले असून सगळीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. येत्या काळात नववी ते बारावीप्रमाणे पाचवी ते आठवीमधील विद्यार्थीसंख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे.

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री