Join us

‘व्होल्व्हो’च्या प्रशिक्षणाला केडीएमटीचा मुहूर्त कधी?

By admin | Updated: October 28, 2014 23:12 IST

ठाणो पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात देखील लवकरच व्होल्व्हो बस दाखल होणार आहेत.

कल्याण : ठाणो पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात देखील लवकरच व्होल्व्हो बस दाखल होणार आहेत. या बस चालविण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असताना केडीएमटी व्यवस्थापनाला अद्यापर्पयत या प्रशिक्षणासाठी मुहुर्त घावलेला नाही. त्यामुळे या बसेस दाखल झाल्यावर प्रशिक्षित चालकांअभावी आगारातच खितपत पडण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत केडीएमटीच्या ताफयात लवकरच नव्या 185 बसेस दाखल होत आहेत. या बस मध्ये 1क् बसेस या व्होल्व्हो आहेत. दरम्यान या बसेस दाखल होण्यापूर्वी उपक्रमातील चालकांना व्होल्व्हो बस चालविण्याचे प्रशिक्षण मिळणो आवश्यक आहे. परंतु आजतागायत चालकांना प्रशिक्षणासाठी केडीएमटी व्यवस्थापनाकडून पाठविण्यात आलेले नाही. 
परिवहन उपक्रमातील सेवाज्येष्ठ, वैद्यकियदृष्टया सक्षम असलेले तसेच ज्यांच्याकडून आजवर अपघात घडलेला नाही अशा चालकांना तात्काळ प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावेत यासंदर्भातले निवेदन परिवहन सदस्य इरफान शेख यांनी केडीएमटीचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांच्याकडे अडीच महिन्यांपूर्वी सादर केले होते परंतु आजतागायत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
यासंदर्भात केडीएमटीचे आगारव्यवस्थापक संदीप भोसले यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता 1क् बसेस साठी 3क् चालकांची आवश्यकता भासणार आहे. उपक्रमात चालकांची संख्या अपुरी असल्याने टप्प्याटप्प्याने चालक कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविला जाणार आहे लवकरच याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत केडीएमटीच्या ताफयात लवकरच नव्या 185 बसेस दाखल होत आहेत. या बस मध्ये 1क् बसेस या व्होल्वो आहेत.