Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 05:38 IST

सकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर -विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला.

मुंबई : सकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर -विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला. या गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या लोकल फेºया २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.घाटकोपर ते विद्याविहार स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच दुरुस्तीपथकाने त्वरित काम सुरू केले. ९ वाजून २० मिनिटापर्यंत रेल्वे खोळंबल्याने सुमारे ७ ते ८ लोकल फेºयांवर याचा परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली, पण दुपारच्या सत्रापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे प्रवाशांनी सांगितले.