Join us  

रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 9:10 AM

मुंबईकडे येणा-या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहेत

मुंबई, दि. 10 - दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली आहे. मुंबईकडे येणा-या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आला आहे, मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सकाळची वेळ असल्याने कामावर वेळेत पोहणचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना विनाकारण स्थानकावर ताटकाळत राहावं लागत आहे. 

दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. यानंतर धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. रुळ दुरुस्तीचं काम पुर्ण झालं आहे, मात्र यामुळे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडलं असून धीम्या मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे.