Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणातून सुटका कधी ?

By admin | Updated: January 25, 2015 23:14 IST

आदिवासीचे कुपोषण कमी करण्यासाठी स्वातंत्र्यापासून अनेक योजनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला

मोखाडा ग्रामीण : आदिवासीचे कुपोषण कमी करण्यासाठी स्वातंत्र्यापासून अनेक योजनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला, तरी स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटल्यानंतर कुपोषण आदिवासींची पाठ सोडायला तयार नाही याच विदारक चित्र मोखाड्यात पहावयास मिळत आहे. आज घडीला ७०५ आदिवासी बालके कुपोषणाच्या विळख्यात असून त्याची कारणेही अगदी साधी आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला गेल्या २१ महिन्यापासून स्वतंत्र अधिकारी नाही तर एकूण १७८ पैकी ५२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नसून यातील तब्बल १५७ अंगणवाड्याना पेयजलाची सुविधा नाही. यामुळे कुपोषण रोखण्यासाठीचा कोट्यावधीचा निधी जातो कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. अंगणवाडी बालकाचे आहार स्वच्छता पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक बालविकास कार्यालयाशी निगडीत आहेत. यामुळे कुपोषण रोखण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे या अनुषंगाने मोखाडा तालुक्यातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. (वार्ताहर)