मुंबई : दिव्यांग प्रवाशांसाठी आता प्रत्येक बस स्थानकावर व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक मोठ्या बस स्थानकावर, आगार मुख्यालयातील बस स्थानकावर येत्या १५ दिवसांत व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहेत.विमानतळ, रेल्वे स्थानकांत दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे दिव्यांग प्रवासी विमानातून किंवा रेल्वेतून उतरल्यावर बाहेर पडण्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाते. मात्र, एसटी प्रवाशांना अशी कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नव्हती. याबाबत दाखल झालेल्या सूचना आणि तक्रारींची दखल घेत, पहिल्या टप्प्यात आगारच्या मुख्यालयातील बस स्थानके, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रातील बस स्थानकावर व्हील चेअर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर ‘व्हीलचेअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 05:51 IST