Join us

मी जो कोणी आहे तो ‘लक ’मुळे - गावसकर

By admin | Updated: May 31, 2015 00:47 IST

मी जो कोणी आहे तो 'लक’मुळे, आयुष्याच्या ठरावीक वळणावर प्रयत्नांसोबत तुमचे लक तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे.

मुंबई : मी जो कोणी आहे तो 'लक’मुळे, आयुष्याच्या ठरावीक वळणावर प्रयत्नांसोबत तुमचे लक तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आम्ही जेव्हा एकत्र ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा, सिनियर खेळाडू ट्रेनच्या खालील बर्थवर, ज्युनियर खेळाडू वरील बर्थवर असायचे. त्या वेळी येणारी मज्जा आजच्या विमान प्रवासात नाही. अशा जुन्या-नव्या आठवणींचा स्ट्रेट ड्राइव्ह मारत सुनील गावसकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. माधव आपटेंच्या पुस्तक प्रकाशनावेळी ते मुंबईत बोलत होते.माधव आपटे यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅज् लक वूड हॅव इट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वानखेडे स्टेडियम येथील गरवारे लाउंज सभागृहात संपन्न झाला. गर्भवती बाईला ज्या यातना सोसाव्या लागतात त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबीयांनी हे पुस्तक लिहिताना सोसल्या आहेत. ते बाळ ९ महिन्यांनी येते तर हे बाळ तब्बल १९ महिन्यांच्या प्रवासाने आज आले आहे. १९५० च्या काळात वेस्ट इंडिजच्या ‘क्लास’ गोलंदाजांसमोर कोणतीही खास सुरक्षितता नसताना त्यांची धुलाई सुनीलने केली. त्यामुळेच तो ‘क्लास खेळाडू’ आहे, असे गौरवौद्गार माधव आपटेंनी गावसकर यांच्याविषयी काढले. विल्सन शाळा ते एल्फिन्स्टन असा क्रिकेटच्या माध्यमातून केलेला प्रवास, लेग स्पीनर बेबी आपटे ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व माधव आपटे, चौपाटीची मुंबई अशा आयुष्यातील वैविध्यपूर्ण घटनांना चित्र आणि शब्दांत सामावून घेतलेले थोडक्यात माधव म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक, असे मनोगत दीपक पारेख यांनी व्यक्त केले. या वेळी सुनील गावसकर, दीपक पारेख, अजित वाडकर यांच्यासह नंदू नाटेकर, वासू परांजपे, मिलिंद रेगे आणि मुंबई क्रिकेट टेस्ट मॅचचे अन्य खेळाडूही या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘टच’ की बात...च्१९७०-७१ साली भारतीय संघ टेस्ट मॅचसाठी वेस्ट इंडिजला गेला होता. त्या काळी भारतीय संघात अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी सुनील गावसकर संघर्ष करत होते. जयंतीलाल यांच्या जागी गावसकर यांची वर्णी लागली. च्१२ धावांवर असताना गॅरी सोबर्सने झेल सोडून पहिले जीवदान दिले. त्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावले, दुसऱ्या मॅचमध्ये जॅकच्या गोलंदाजीवर झेल सोडत पुन्हा जीवदान दिले त्या मॅचमध्ये शतक झळकावले. च्यामुळे गॅरी सोबर्स रोज सकाळी येऊन भारतीय खेळाडूंची विचारपूस करून सुनील गावसकरांना ‘टच’ करत असे, त्यामुळे उत्कृष्ट खेळी करत असे. शेवटच्या सामन्यात गॅरी सोबर्स आला असता अजित वाडेकरने सुनील गावसकरला बाथरूममध्ये बंद केले. योगायोग म्हणजे या मॅचच्या पहिल्याच बॉलमध्ये अलीच्या गोलंदाजीवर गॅरी सोबर्स क्लीन बोल्ड झाले... तेव्हा वाडकर गावसकरला म्हणाले, ‘पाहिलंस तो तुला टच करू शकला नाही म्हणून पहिल्याच बॉलवर आऊट झाला. यालाच बोलतात टच की बात...’