Join us

स्टेशन मास्तर तरी काय करणार? , पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 14:15 IST

गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही

मुंबई : गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही, ही तक्रार कोणत्या राजकीय पक्षाची नाही, तर ती केली आहे जोगेश्वरी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर प्रसाद यांनी. पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याची व्यथा त्यांनी शुक्रवारी येथे आंदोलनासाठी आलेल्या मनसेपुढे मांडली.मनसेने आंदोलन पुकारले आणि आमचे नेते, कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतील असे मनसेने जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे जोगेश्वरी स्टेशनवर गेल्या. त्यांनी तिथल्या समस्यांचा पाढा वाचला आणि तुम्ही काय करत आहात, असा जाब स्टेशन मास्तर प्रसाद यांना विचारला. तेव्हा प्रसाद यांनी शांतपणे एक रजिस्टर काढून त्यांच्यापुढे ठेवले. तुम्ही ज्या तक्रारी करत आहात त्या आम्ही गेल्या दोन वर्षांपासून आमच्या वरिष्ठांना करतोय. हे पाहा रजिस्टर. सगळ्या नोंदी पाहा, आता जर वरूनच काही होत नसेल तर आम्ही काय करणार, असेही ते उद्विग्नपणे म्हणाले. तेव्हा त्यांनाच दिलासा देण्याची वेळ शालिनी ठाकरे यांच्यावर आली. या वेळी मनसेचे जोगेश्वरी विभाग अध्यक्ष प्रमोद म्हसकर, वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई, उपविभाग अध्यक्ष विशाल हरियाण, शाखाध्यक्ष अशोक पाटील, प्रशांत राणे, प्रदीप पांचाल, रशीद शेख आदींचा समावेश होता.केंद्रीय आॅडिटरही हतबलमनसेची टीम तेथे जाऊन आली हे कळताच, रेल्वेची आॅडिट समिती तेथे येणार असा मेसेज त्याच स्टेशनवर काम करणाºया एका पोर्टरने मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. तुम्ही इकडे या, आॅडिटची टीम येणार आहे, तुम्हीच तक्रारी मांडा... आणि केंद्रीय आॅडिट समितीला मनसेच्या शिष्टमंडळाने वरील समस्यांचा पाढा वाचून दाखवल्यानंतर तेही अवाक् झाले. यासाठी तातडीने पावले उचलू, लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करू एवढे बोलण्यापलीकडे केंद्रीय आॅडिटरही काही करू शकले नाहीत.

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई उपनगरी रेल्वेआता बास