Join us

पावणेदोन तासांत काय झाले?

By admin | Updated: October 19, 2015 02:38 IST

दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू पावलेल्या तरुणा धवलकुमार भिंगारा (२७) च्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. रात्री १२ वाजता बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलेल्या तरुणाचा

मनीषा म्हात्रे, मुंबईदहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू पावलेल्या तरुणा धवलकुमार भिंगारा (२७) च्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. रात्री १२ वाजता बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पावणे दोनच्या सुमारास खिडकीतून पडून मृत्यू होतो. या पावणे दोन तासांत ती काय करत होती? किंवा काय घडले? याचा शोध पोलीस घेत आहेत.मूळची दिल्ली येथील रहिवाशी असलेल्या तरुणा हिचा धवलकुमार भिंगारासोबत वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. धवलकुमार बँक आॅफ अमेरिकामध्ये सहायक अधिकारी असून, तरुणा गृहिणी होती. मुंबईत नोकरी असल्याने लग्नाच्या काही दिवसांनंतर तरुणा पतीसोबत वरळी येथील सुखदा इमारतीत राहण्यास आली. गेल्या नऊ महिन्यांपासून येथील दहाव्या मजल्यावरील १००२ फ्लॅटमध्ये हे दोघे भाडेतत्त्वावर राहत होते. त्यांचे मित्र नेहमी घरी ये-जा करत असत. बुधवारी तिचा दीरही त्यांच्याकडे राहण्यास आला होता. शुक्रवारी रात्री पती आणि दिरासोबत तिने जेवण घेतले. त्यानंतर धवलकुमारचे दोन मित्र घरी आले. त्यांच्यासोबत गप्पांची मैफल रंगल्यानंतर, रात्री १२ च्या सुमारास झोपायला जाते, असे सांगून तरुणा बेडरूममध्ये निघून गेली. रात्री उशिरापर्यंत पती आणि मित्र गेम खेळत होते. रात्री पहारा देत असलेल्या सुरक्षारक्षक मोहितेला जोराचा आवाज झाला, म्हणून त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा एक महिला खाली कोसळली होती. इमारतीतून महिला पडल्याने एकच गोंधळ उडाला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात केले. पती आणि मित्रांच्या जबाबानुसार, वॉचमनने दिलेल्या माहितीनंतर कोणीतरी खाली कोसळल्याचे समजले. तरुणाचा बेडरूमचा लॉक तोडून आम्ही आतमध्ये प्रवेश केला, तेव्हा खिडकी पूर्ण उघडी होती. खाली तरुणाचा रक्ताळलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला.मात्र, रात्री १२ वाजता झोपण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रात्री पावणे दोनच्या सुमारास पडून मृत्यू होतो. या मधल्या कालावधीत ती काय करत होती? किंवा काय घडले? ज्यामुळे ती खिडकीपर्यंत पोहोचली. त्यातही ती खिडकीतून खाली पडली, ढकलली गेली की तिने उडी मारली, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)