Join us

‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय?निकाल गोंधळ सुरूच; वाणिज्यचे निकाल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 02:04 IST

आॅगस्ट महिना संपत आला तरीही मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी धिम्या गतीने सुरू आहे. ४०० हून अधिक निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असले तरीही वाणिज्यच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचे काय, या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही.

मुंबई : आॅगस्ट महिना संपत आला तरीही मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी धिम्या गतीने सुरू आहे. ४०० हून अधिक निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असले तरीही वाणिज्यच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचे काय, या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा वेग गणेशोत्सवाच्या काळात मंदावलेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.विद्यापीठाने ३१ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापकांना पाचारण केले जात आहे. पण गणपती असल्यामुळे प्राध्यापकांची संख्या रोडावली आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी प्रभारी अधिकारीही कंबर कसून काम करून घेत आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ