Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओला चालकाला लुटणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

मुंबई : ओला चालकाला लुटणाऱ्या तरुणाला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. सुफियान खान असे त्याचे नाव आहे. त्याने ३ जानेवारी ...

मुंबई : ओला चालकाला लुटणाऱ्या तरुणाला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. सुफियान खान असे त्याचे नाव आहे. त्याने ३ जानेवारी रोजी सांताक्रूझ पूर्वेकडून कुलाबा येथे येण्यासाठी ओला बुक केली. पुढे निर्जन स्थळी पोहोचताच चालकाला धमकावून त्याच्याकडून दागिन्यासह २० हजार रुपये लुटले.

.....................................

सराफाला ६ लाखांचा गंडा

मुंबई : सराफाला केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. याप्रकरणी सराफाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, ते अधिक तपास करीत आहेत.

............................................

जीएसटी अधीक्षकाला धमकी

मुंबई : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीनंतर महिलेने जीएसटी अधीक्षकाला विवस्त्रावस्थेत व्हिडिओ कॉल केला. पुढे हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. जीएसटी अधीक्षकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

...................................