Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेने सुरू केला स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

मुंबई : पश्चिम रेल्वेने नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे, पुश-पुल प्रकल्प असो किंवा ऊर्जा वाचविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ...

मुंबई : पश्चिम रेल्वेने नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे, पुश-पुल प्रकल्प असो किंवा ऊर्जा वाचविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सोलर पॅनल्स बसविणे असो. पश्चिम रेल्वेने नुकताच मुंबई विभागाच्या मुंबई सेंट्रल कोचिंग डेपोमध्ये स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू केला आहे.

या प्लांटमुळे संपूर्ण गाड्यांची धुण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबविता येणार आहे. तसेव्हे वेळ, पाणी आणि मनुष्यबळ यांची होणार आहे.(??) डेपो धुण्यासाठी वर्षाला ६८ लाख रुपये लागतात.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, या प्लांटमध्ये प्री-वेट स्टेशन,४ व्हर्टिकल ब्रशिंग युनिट, फिक्स्ड डिस्क ब्रशचा एक संच, रिट्रॅक्टेबल डिस्क ब्रशचा एक संच, अंतिम धुण्याच्या टॉवर्सच्या दोन जोड्या आणि एक ब्लोअर आहे.

स्वयंचलित कोच वॉशिंग प्रकल्पात पर्यावरणीय निकषांची पूर्तता करण्यात आली आहे. युनिटमधून रेकची हालचाल लक्षात आल्यावर प्लांट आपोआप काम करते आणि २० मिनिटांच्या आत २४ कोचरॅक धुतले जाते.

या प्लांटमध्ये पाण्याच्या वापर कमीतकमी होतो. मॅन्युअल धुण्याच्या तुलनेत सुमारे ६० टक्के कमी पाणी वापरले जाते. ज्यामुळे दरवर्षी सुमारे १.८ दशलक्ष लीटर शुद्ध पाण्याची बचत होते. (यामधून ३६५ शहरी व्यक्तींच्या वर्षभराची पाण्याची गरज भागविली जाऊ शकते.)

प्लांटची एकूण किंमत १.६७ कोटी रुपये आहे आणि अखेर ३० डिसेंबर, २०२० रोजी त्याची नियुक्ती करण्यात आली. स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट हा पर्यावरणपूरक आणि खर्च वाचविणारा पर्याय आहे आणि रेल्वेच्या देखभालीत ऑटोमेशनच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

(नोट- कृपया बोल्ड केलेले वाक्य पाहणे.)