Join us  

पश्चिम रेल्वेने दुधाची वाहतूक करून केली ६ कोटी ४५ लाख रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 7:50 PM

पश्चिम रेल्वेने तब्बल ३ काेटी ७९ लाख लीटर दुधाची वाहतुक करुन संपुर्ण भारतीय रेल्वेत एक नवीन इतिहास नोंदविला आहे. 

 मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पश्चिम भारतीय रेल्वे देशभरात जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक करत आहे. यासाठी मालवाहतुक आणि पार्सल वाहतुकीवर विशेष भर दिला आहे. या काळात पश्चिम रेल्वेने तब्बल ३ काेटी ७९ लाख लीटर दुधाची वाहतुक करुन संपुर्ण भारतीय रेल्वेत एक नवीन इतिहास नोंदविला आहे. वाहतुकीमधून पश्चिम रेल्वेच्या तिजाेरीत ६ काेटी ४५ लाख रुपयाची कमाई केली आहे. 

रेल्वे प्रशासनाने लॉकडाऊन काळात वैद्यकीय साधने, अन्नधान्य, काेळसा, पेट्राेलियम पदार्थाची वाहतुक करण्यावर भर दिला आहे. रेल्वेने पार्सल ट्रेनच्या वाहतुकीसाठी खास वेळापत्रक तयार केले आहे. पश्चिम रेल्वेने दुधाच्या ५१ गाड्या ( ८८२ टँकर ) गुजरातमधील पालनपुर येथून हरियाणाच्या पलवाल येथे पाेहाेचविल्या आहेत. संपुर्ण देशात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पाेहाेचविण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष वाहतुक केली आहे.

पश्चिम रेल्वेने २२ ते ३१ मार्चपर्यंत ३३.३२ लाख लीटर दुधाच्या ५ गाड्या, एप्रिल महिन्यात १ काेटी लीटर दुधाच्या १५ तर मे महिन्यात १ काेटी २८ लाख लीटर दुधाच्या १७ गाड्या धावल्या. २८ जूनपर्यत १ काेटी ९ लाख लीटर दुधाच्या १४ गाड्या धावल्या. याशिवाय पश्चिम रेल्वे  प्रशासनाने ४ लाख ८ हजार दुग्धजन्य पदार्थाची वाहतुक केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये माेठ्या प्रमाणात दुधाची वाहतुक करुन पश्चिम रेल्वेने नवीन इतिहास नोंदविला आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वेदूध पुरवठाभारतीय रेल्वे