Join us

तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान पश्चिम रेल्वेने वसूल केला ५२ कोटी रुपये दंड

By सचिन लुंगसे | Updated: July 10, 2024 19:38 IST

Western Railway News: लोकल, मेल / एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. याद्वारे ५२.१४ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

मुंबई  - लोकल, मेल / एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. याद्वारे ५२.१४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, यात मुंबई उपनगरीय विभागातून १४.६३ कोटी वसूल करण्यात आले आहेत.

जूनमध्ये बुक न केलेल्या सामानासह २.२५ लाख अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन १४.१० कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय जूनमध्ये पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १ लाखांहून अधिक प्रकरणे शोधून काढली आणि ४.३५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी नियमित सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल ते जून या कालावधीत सुमारे १३ हजार अनधिकृत प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला असून सुमारे ४३.६४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई