वेस्टर्न....अंधेरी राजा मंडळाचे फर्मान....
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST
वेस्टर्न....अंधेरी राजा मंडळाचे फर्मान....
वेस्टर्न....(अंधेरी राजाचा एखादा आधीचा फोटो वापरता येईल)अंधेरी राजा मंडळाचे फर्मान....तोकडे कपडे, मिनी स्कर्ट आणि स्लिव्हलेस ड्रेसला यंदाही बंदीम्हैसूरच्या महालात विराजमान अंधेरी राजाच्या दर्शनाला गर्दीअंधेरी : यंदा म्हैसूरच्या महालात विराजमान झालेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत आहे. यंदाही अंधेरीच्या राजाला ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे, मिनी स्कर्ट आणि स्लिव्हलेस ड्रेस घालून येणार्या गणेशभक्तांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. संस्कृतीचे पालन आणि अंधेरीच्या राजाचे पावित्र्य लक्षात घेता आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीने २०१२मध्ये ड्रेसकोड लागू केला होता. गेल्या वर्षी तोकडे कपडे घालून आलेल्या २०० गणेशभक्तांसह एका अभिनेत्रीला अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बबन तोंडवलकर आणि खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली. यंदा वसार्ेवा-घाटकोपर मेट्रोमुळे अंधेरी राजाचे दर्शन पूर्व उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ याभागातील गणेशभक्तांना सोयीस्कर होत आहे. त्यामुळे यंदा लाखो भाविक अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतील, असा विश्वास समितीचे राजेश फणसे आणि सुबोध चिटणीस यांनी व्यक्त केला आहे. मंडप परिसरात वायफाय सेवाही भक्तांसाठी देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. परळ रेल्वे वर्कशॉपमधील प्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांनी ८.५ फुटांची अंधेरी राजाची मूर्ती घडवली आहे. यंदाचे आकर्षण म्हणजे अंधेरीचा राजा म्हैसूरच्या प्रसिद्ध टिपू सुलतानच्या महालात विसावला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सावला आणि धर्मेश शहा यांच्या संकल्पनेतून सुमारे २५० कलाकारांनी दोन महिने अहोरात्र काम करून म्हैसूर महालाचा हुबेहुब देखावा साकारला आहे.यंदा अंधेरीचा राजाचा सभा मंडप, २५० कार्यकर्ते आणि दर्शनाला येणारे लाखो गणेशभक्त, सोन्या चांदीचे दागिने, विसर्जन मिरवणूक यांचा एकत्रित सुमारे ३ कोटी ७५ लाखांचा विमा उतरवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर समितीचे २५० कार्यकर्ते अहोरात्र पहारा ठेवत असल्याची माहिती सचिव विजय सावंत आणि उदय सालियन यांनी दिली. (प्रतिनिधी)