Join us

वेस्टर्न लीड...चारकोप येथे शाळेतील मुलींसोबत छेडछाडीचा प्रकार

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

वेस्टर्न लीड....

वेस्टर्न लीड....
..........................
चारकोप येथे शाळेतील मुलींसोबत छेडछाडीचा प्रकार
महिन्यापासून पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका
कांदिवली: कांदिवली चारकोप परिसरातील भाबरकेर नगर येथील शाळेतील विद्यार्थिनींसोबत छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. तक्र ार करुनही चारकोप पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.
चारकोप भाबरेकरनगर येथे सरोजादेवी विद्यालय ही हिंदी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शिकणार्‍या नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसोबत काही तरु ण मुले शाळा परिसरातच छेडछाड करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा ज्या भागात आहे, त्या सोसायटीत रहदारीचा एकमेव मार्ग आहे. त्या रस्त्यावरच ही तरु ण मुले दबा धरुन बसतात. सकाळी दहा वाजता मधल्या सु˜ीच्या वेळी आणि दुपारी शाळा सुटताना साडेबाराच्यावेळी काही टवाळखोर मुले येथे जमतात. शाळेच्या बाहेर मुली आल्यावर अश्लील संवाद करतात. नोव्हेंबर महिन्यात याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यात आली होती. मात्र चारकोप पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. तक्रार केल्याचे कळताच काही दिवस हा प्रकार थांबला. मात्र पुन्हा थोड्याच कालावधीनंतर त्या टवाळखोर मुलांनी हे प्रकार पुन्हा सुरु केले. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अभिसार मेहता यांच्याकडे काही विद्यार्थिनींनी तक्र ार केली. त्यानंतर शुक्र वारी चारकोप पोलीस ठाण्यात मेहता यांनी पुन्हा तक्र ार केली. एक महिन्यांहून अधिक काळ हा प्रकार सुरु असताना चारकोप पोलीस इतके दिवस बघ्याची भूमिका का बजावत होते? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला आहे. शुक्र वारी चारकोप पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध तक्र ार दाखल केली.
शाळेच्या आत विद्यार्थी व विद्यार्थिनींची जबाबदारी शाळेची आहे. मात्र शाळेबाहेर आम्ही विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करणार? असा सवाल शाळा प्रशासनाने केला आहे. या प्रकाराची तक्र ार चारकोप पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी योग्यवेळी कारवाई न केल्यामुळे हा प्रकार वाढत चालला आहे. आम्हाला विद्यार्थिनींची काळजी वाटत असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
................................................
(कोट)
शाळेबाहेर साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात येईल. त्या छेडछाड करणार्‍या तरु णांवर कारवाई करण्यात येईल. याबाबत कोणीही माझ्याकडे तक्र ार घेऊन आले नाही. चारकोपचे वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत आदेश देऊन शाळेला भेट देतील. शाळा परिसराची पाहणी करतील.
-बालसिंग राजपूत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ११
.........................................
(चौकट)
हटकल्यानंतर मारहाण...
दोन महिन्यांपूर्वी या शाळेतील विद्यार्थिंनींसोबत छेडछाडीचा प्रकार घडला होता. त्यावेळी शाळेचे सचिवांनी त्या मुलांना हटकले असता त्यांना बांबूने मारहाण करण्यात आली होती.
.........................................