Join us

वेस्टर्न लीड...फोटोसह....चाळीतील घरांवर मोबाईल टॉवर

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

वेस्टर्न लीड...फोटोसह.....फोटो मेलवर आहेत....

वेस्टर्न लीड...फोटोसह.....फोटो मेलवर आहेत....
................................
कांदिवलीत चाळीतील घरांवर मोबाईल टॉवर
पालिका मात्र अनभिज्ञ
जयाज्योती पेडणेकर : मुंबई
कांदिवली पश्चिम वाडीलाल गोसालिया रोड येथील संजय नगरमधील नवजीवन सेवा सोसायटीत दोन मोबाईल कंपन्यांनी चक्क झोपडप˜ीसदृश्य चाळीतील घरांवर मोबाईल टॉवर बसवले आहेत. याबाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. याबाबत आर दक्षिण पालिका विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता, ते याविषयी अनिभज्ञ असल्याचे समजले.
अनुप इन्टरप्राईज या कंपनीचे नवजीवन चाळीत एक घर आहे. या कंपनीचे मोबाईल टॉवरमध्ये प्रयोग करण्यात येणार्‍या काही घटकांचा कारखाना आहे. या कंपनीच्या मालकाने चक्क घर भाड्याने देऊन त्यावरच दोन मोबाईल कंपनींचे टॉवर लावले आहेत. स्थानिकांनी विरोध करुनही हे टॉवर बसवण्यात आलेत. टॉवरच्या एन्टीनाची उंची ७ मीटर आहे. तितक्याच उंचीची स्थानिकांची घर ेआहेत. भारतीय दूरसंचार नियामन प्राधिकरण नियमावलीनुसार टॉवरच्या एन्टिना निवासी क्षेत्रानुसार २५ मीटर दूर असणे आवश्यक असते. झोपटप˜ी विभाग असल्याने एन्टिना लोकांच्या घरांपासून केवळ ४ ते ५ मीटर लांब आहे. टॉवरच्या एन्टीनामधून निघणार्‍या रेडिएशनचा त्रास स्थानिकांना होत आहे. त्यामुळे सामान्य स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नवजीवन सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे.
............................
पालिका अधिकारी आणि इमारत विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संबंधित विभागाची स्वत: पाहणी करु न कारवाई करण्यात येईल.
-रामआशीष गुुुप्ता, प्रभाग समिती अध्यक्ष, आर दक्षिण पालिका विभाग
............................