वेस्टर्न....अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पत्रकार गजाआड
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पत्रकार गजाआड
वेस्टर्न....अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पत्रकार गजाआड
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पत्रकार गजाआडजोगेश्वरी : जोगेश्वरी पोलिसांनी एका वर्तमानपत्रात काम करणार्या पत्रकाराला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली बुधवारी अटक केली आहे. शैलेश जयस्वाल (४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी दिली. विशेष म्हणजे, या प्रकरणी पत्रकाराच्याच पत्नीनेच पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आपल्याच मेव्हण्याच्या मुलीला घरकामात मदत करण्यासाठी व मुलांची देखभाल करण्यासाठी उत्तरप्रदेशातून जोगेश्वरी येथील घरी आणले होते. घरी कोणी नसताना अनेकदा त्याने पीडित मुलीशी जवळीक साधून शारिरीक अत्याचार केले. या प्रकरणाचा संशय त्याच्या बायकोला येताच, पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. आरोपीच्या पत्नीनेच त्या मुलीला घेऊन तत्काळ जोगेश्वरी पोलीस ठाणे गाठले व पोलिसात नवर्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला नायर रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता, मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक केली आहे. (प्रतिनिधी)