Join us

वेस्टर्नसाठी...भानजी बंधूंच्या गणपतीला सार्वजनिक स्वरूप

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

वेस्टर्नसाठी....

वेस्टर्नसाठी....

वेसाव्याच्या भानजी बंधूंच्या गणपतीला सार्वजनिक स्वरूप

अंधेरी: वेसावे कोळीवाड्यातील शिवगल्लीतील भानजी बंधूच्या घरगुती गणपतीला आता जणू सार्वजनिक स्वरूप आले आहे. यंदा या गणपतीचे ७७ वे वर्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील जुना गणपती अशी ख्याती असलेले भानजी कुटुंब वेसावे-मढ येथे विखुरलेले असले, तरी या कुटुंबातील सुमारे १५० सदस्य गणेशोत्सवासाठी एकत्र येतात आणि दरवर्षी छोट्याशा जागेत पौराणिक देखावे साकार करण्यात भानजी कुटुंबियांचा वाटा असतो.
यंदा डॉ. बाळाराम भानजी, राज भानजी, नारायण भानजी, जयेंद्र भानजी, उत्पल भानजी, प्रवीण भानजी, सुदर्शन भानजी आणि भानजी कुटुंबियांनी १५-२० दिवसांच्या कष्टातून साकारलेला शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर अवतरल्याचा देखावा भाविकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
या गणपतीविषयी अधिक माहिती देताना डॉ. गजेंद्र भानजी यांनी सांगितले, की ७७ वर्षांपूर्वी वेसावे गावात प्लेगची साथ आली होती. अनेकजण गाव सोडून गेले होते.भानजी कुटुंबाच्या दोन भावंडांनाही प्लेगची लागण झाली होती. त्यावेळी त्यांची आई माणुकाबाई यांनी गणपतीकडे गार्‍हाण मांडलं. पुढे त्यांची दोन्ही मुले ठणठणीत बरी झाली. त्यानंतर भानजी कुटुंबियांकडे ७५ वर्षांपूर्वी गणपतीची स्थापना करण्यात आली. पूर्वी येथील गणपती दीड दिवसांचा होता. पण यथावकाश तरूणांच्या आग्रहास्तव येथील गणपती गौरी विसर्जनापर्यंत बसवण्यात येऊ लागल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)