Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेस्टर्न.....अंधेरी राजाच्या मिरवणुकीला अलोट गर्दी

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

अंधेरी राजाच्या विसर्जन मिरवणुकीला लोटली अलोट गर्दी

अंधेरी राजाच्या विसर्जन मिरवणुकीला लोटली अलोट गर्दी

वेसावे समुद्रात आज दुपारी होणार विसर्जन

अंधेरी: मुंबईसह राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणपतींचे अनंत चतुर्थीला विसर्जन होते. मात्र, याला अपवाद फक्त अंधेरीचा राजा आहे. अंधेरीच्या राजाचे मात्र संकष्टीलाच विसर्जन होते. आझाद नगरमधून सजवलेल्या ट्रकवर आरुढ झालेल्या अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी हजारो अंधेरीकरांनी राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. शनिवारी दुपारी १ नंतर अंधेरीच्या राजाचे सुमारे २० तासांच्या मिरवणुकीनंतर वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन होणार आहे.
अंधेरी राजाच्या विसर्जन मार्गावरील आझादनगर, वीरा देसाई रोड, आंबोली, एस.व्ही.रोड, अंधेरी मार्केट, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, वेसावे या भागात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राजाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या आहेत. सुवासिनींनी ठिकठिकाणी ओवाळून अंधेरीच्या राजाचे स्वागत केले. राजाच्या दर्शनानंतरच गणेशभक्तांनी संकष्टीचा उपवास सोडला. अंधेरी मार्केट परिसरात येथील अल्पसंख्यांक बांधवांनी सुद्धा अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी विसर्जन मार्गावर पाणपोई आणि अल्पोपहाराची सुविधा अंधेरीकर आणि व्यापार्‍यांनी उपलब्ध करून दिली. (प्रतिनिधी)