Join us

वेस्टर्न......१२५ कुपोषित बालकांची तपासणी

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

(शिल्लक बातमी...पुन्हा पाठवत आहे....)

(शिल्लक बातमी...पुन्हा पाठवत आहे....)

१२५ कुपोषित बालकांची तपासणी

अंधेरी: अंधेरी-जुहू परिसरातील सहा वर्षांखालील १२५ कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. भवन्स कॉलेज जवळील जानकीदेवी सभागृहात हे शिबिर भरवण्यात आले होते. या सर्व कुपोषित बालकांना मनसे नेते रईस लष्करिया यांनी एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. अंगणवाडी सदस्यांना बालकांच्या वजन तपासणीसाठी सुमारे ३०० वजन मशीनही त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.
पूर्वी या भागात ३०० कुपोषित बालके होती, आता ते प्रमाण १२५ वर आल्याचे बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रेमा घाटगे यांनी सांगितले. हिरकणी महिला सेनेतर्फे हे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. बालरोग निदानतज्ज्ञ डॉ.उमरसिंग वळवी यांनी मुलांची तपासणी केली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुषमा केणी, वासिमा मुजावर, हिरकणी महिला सेनेचे संचालक विशाल घाग आणि १४५ अंगणवाडी सेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)