Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीने नाताळचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने घट नोंदविण्यात येत असून, येथील किमान तापमान गुरुवारी १६ अंश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने घट नोंदविण्यात येत असून, येथील किमान तापमान गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले. पुढील काही दिवस ते १६ अंशावर स्थिर राहण्याची शक्यता असून, आजच्या नाताळचे स्वागत गुलाबी थंडीने होईल.

मुंबईच्या आतील भागांचा विचार करता गोरेगाव आणि पनवेल या ठिकाणी किमान तापमानाची नोंद १५ अंश झाली असून, किमान तापमानाचा पारा स्थिर राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी, वर्षाखेर आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या पंधरा दिवसांपर्यंत तरी मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येईल.

गेल्या रविवारपासूनच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. येथील किमान तापमान १९ अंशापासून १५ अंशावर खाली उतरले असून, गेल्या चार दिवसांत ते १६ ते २० अंशादरम्यान आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान १५ ते १६ अंशावर स्थिर असून, चालू हंगामातील नीचांक नोंदविण्यात येत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६.२ अंश नोंदविण्यात आले.

मुंबईच्या आतील परिसरांचा विचार करता गोरेगाव येथील किमान तापमानाची नोंद १५.१० अंश झाली. पनवेल येथे १५.९४ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. वरळी, बीकेसी, कांदिवली, बोरीवली, मालाड, चारकोप आणि पवईतील बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले.

.............................