Join us

बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाइट हॅक

By admin | Updated: December 19, 2014 01:24 IST

भारतासह परदेशांतील बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाइट पाकिस्तानी संघटनेने हॅक केली आहे

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईभारतासह परदेशांतील बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाइट पाकिस्तानी संघटनेने हॅक केली आहे. या वेबसाइटवरून आझाद काश्मीरची मागणी करत जिहादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. बेलापूर येथे राहणाऱ्या आर. के. महापात्रा यांची सर्च बोर्डिंग स्कूल नावाची वेबसाइट आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी ही वेबसाइट सुरू केली आहे. यावर भारतातील सुमारे १५० तर अमेरिका व इतर देशांतील सुमारे २०० अशा एकूण ३५० हून अधिक बोर्डिंग शाळांची माहिती आहे. त्यानुसार देश-विदेशातील गरजू विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात या वेबसाइटचा वापर केला जातो. मात्र बुधवारी मिडल इस्ट सायबर आर्मी या पाकिस्तानी संघटनेने ही वेबसाइट हॅक केली. भारताविरोधात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया वाढत असतानाच हा प्रकार घडला आहे. पाकिस्तानात नुकताच शाळेवर हल्ला झाला आहे. त्यामुळे हॅक केलेल्या या वेबसाइटवरून चोरलेल्या माहितीचा गैरवापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची भीती व्यक्त हातेय. वेबसाइट हॅक झाल्याची तक्र ार आर. के. महापात्रा यांनी सायबर सेलकडे केली. हॅक केल्यानंतर या वेबसाइटवर तुम्ही मुस्लिमांना मारू शकता मात्र इस्लाम संपवू शकत नाही, असा संदेशही भारताच्या नावे दिला आहे.