Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही कसाब नाही, भूमिपुत्र आहोत’

By admin | Updated: April 19, 2016 02:46 IST

मालवणीतील दोन सख्ख्या भावांना गेल्या शनिवारी नौदलाच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी सोमवारी मालाड गावठण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले.

मुंबई : मालवणीतील दोन सख्ख्या भावांना गेल्या शनिवारी नौदलाच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी सोमवारी मालाड गावठण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘आम्ही कसाब नसून, भूमिपुत्र आहोत,’ असे स्थानिकांनी ठणकावून सांगितले.आम्ही नौदलाच्या विरोधात नाही. मात्र, मालाडच्या जनकल्याण नगरमधील गेविन कोरिया (१६) आणि ब्रँडिन कोरिया (२०) या दोघा भावंडांना विनाकारण मारहाण करण्यात आली, हे सर्वथा चुकीचे असल्याचे खासदार गोपाल शेट्टी यांनी या आंदोलनादरम्यान सांगितले.मदर तेरेसा फाउंडेशनचे प्रमुख आणि भाजपा पक्षाच्या मालाड विधानसभेचे सचिव जॉन डेनिस यांनीदेखील नौदलकडून स्थनिकांना मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत असून, या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. मालाड गावठण संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात सुमारे पाचशे स्थानिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)