Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफॉर्मर कोसळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: June 18, 2015 00:39 IST

नव्याने खांब उभारून त्यावर ट्रान्सफार्मर न बसविता जुन्याच झुकलेल्या खांबावर बसवून दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने मुरबे येथे केला आहे.

बोईसर : नव्याने खांब उभारून त्यावर ट्रान्सफार्मर न बसविता जुन्याच झुकलेल्या खांबावर बसवून दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने मुरबे येथे केला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तक्रार करूनही कंपनी लक्ष देण्याच्या मानसिकतेत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील शेतकी सोसायटी व नरोत्तम चुरी यांच्या घराजवळ ट्रान्सफॉर्मर असून तिथून भंडार आळी व इतर ठिकाणी वीजपुरवठा केला जात आहे. हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर मुख्य रस्त्यापासून काही अंतरावरच आहे. वीज खांब गंजल्यामुळे ट्रान्सफॉर्मर खांबासह झुकला आहे. दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील कार्यालयात निवेदन दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (वार्ताहर)