नायगाव : वादळी वाऱ्याचा जोर गुरुवारी कमी झाला, तरी वसई समुद्र किनाऱ्यावरील हाय टाईडमुळे मोठ्या लाटा उसळल्या होत्या. दुपारी १२ वा. पासून जवळपास ४ मीटर उंचीच्या लाटा सुरुची बाग, मर्सिस रानगांव किनाऱ्यावर दिसून येत होत्या. या लाटांनी वसईचा समुद्र किनारा अक्षरश: धुवून काढला. नव्यानेच सुरू झालेल्या सुरूची बाग येथील बंधाऱ्यालाही त्याचा फटका बसला. दुपारनंतर पाण्याची पातळी वाढल्यावर पर्यटकांनी किनाऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच पर्यटनाचा आनंद घेतला. (वार्ताहर)
वसई किनाऱ्याला लाटांचा तडाखा
By admin | Updated: June 12, 2014 23:58 IST