Join us

गुरुवारी पाणीकपात

By admin | Updated: August 4, 2015 01:23 IST

महापालिकेच्या वतीने शिवडीमधील रफी अहमद किडवाई मार्गावरील १,४५० व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे

मुंबई : महापालिकेच्या वतीने शिवडीमधील रफी अहमद किडवाई मार्गावरील १,४५० व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरू होणारे हे काम ६ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होईल. त्यामुळे या कालावधीत शीव, माटुंगा, दादर, पारशी कॉलनी, हिंदू वसाहत, दादर टीटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, कात्रक मार्ग, आर. ए. किडवाई मार्ग, सहकार नगर महापालिका वसाहत व कोरबा मिठागार येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.दादर, नायगांव, परळ, लालबाग, चिंचपोकळी, एस. एस. राव मार्ग, शिवडी पूर्व व पश्चिम परिसर, ज्ञानेश्वर नगर, शिवडी महापालिका क्षयरोग रुग्णालय, अभ्युदय नगर येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच उर्वरित भागात परळ व्हिलेज, आंबेवाडी, काळेवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी या परिसरातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करावा आणि काटकसरीने पाण्याचा उपयोग करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.मोडक १६१.६५तानसा१२५.६८विहार७६.७१तुळशी१३८.६१अ.वैतरणा५९८.७९भातसा१२६.७५म.वैतरणा२८४.३९(प्रतिनिधी)