Join us

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 9, 2017 01:22 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन व भत्त्यांची जबाबदारी राज्य शासने घ्यावी, म्हणून पुकारलेले आंदोलन अधिक चिघळले आहे.

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन व भत्त्यांची जबाबदारी राज्य शासने घ्यावी, म्हणून पुकारलेले आंदोलन अधिक चिघळले आहे. पाणीपुरवठा मंत्र्यांनंतर वित्तमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीतही ठोस निर्णय झाला नसल्याने, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मात्र, सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याने, बुधवारी पुकारलेले पाणीपुरवठा बंद आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)