Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा बंद राहणार

By admin | Updated: May 24, 2014 02:02 IST

महानगरपालिकेच्या वतीने ७२ इंच व्यासाच्या जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम जागृतीनगर, मेट्रो स्टेशन, घाटकोपर येथे २८ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे

मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने ७२ इंच व्यासाच्या जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम जागृतीनगर, मेट्रो स्टेशन, घाटकोपर येथे २८ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम २९ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. परिणामी, या कालावधीत एल विभागातील साने गुरुजीनगर, अशोकनगर, हिमालय सोसायटी, जंगलेश्वर महाराज रोड, मोहिली पाइपलाइन रोड आणि एन विभागातील आनंदनगर पार्क साईट, विक्रोळी पार्क साईट, रामनगर, गोळीबार रोड, भीमनगर, कातोडी पाडा, भटवाडी, बर्वे नगर, सिद्धार्थनगर, आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिल.