Join us

टँकरने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: July 15, 2015 22:46 IST

जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १४ धरणे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याने गाव-वाड्यांमध्ये टँकरद्वारे होणारा

- आविष्कार देसाई, अलिबागजून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १४ धरणे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याने गाव-वाड्यांमध्ये टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण २८ धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. ६८.२८६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठ्यापैकी आजपर्यंत ५१.०१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. जून महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्यातील २८ पैकी १४ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.पावसापूर्वी पाणीटंचाईचे ग्रहण जिल्ह्याला लागले होते. पाणीटंचाईसाठी सुमारे साडेसहा कोटींचा कृती आराखडा तयार केला होता. धरणांनीही तळ गाठला होता, तर काही धरणे ही आटण्याच्या स्थितीत होती. त्याच सुमारास पावसाने बरसून सर्वांनाच सुखाचा धक्का दिला होता. जिल्ह्यात रोहे-कोलाड लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण २८ धरणे येतात. त्याची पाणी साठवण क्षमता ही ६०.२८६ दशलक्ष घनमीटर अशी आहे. १५ जुलै २०१५ पर्यंत या धरणांमध्ये ५१.०१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे. बेफाम बरसलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. टंचाईच्या काळात हाच आकडा २० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचला होता. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टँकरने करण्यात येणारा पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाने बंद केला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रशेखर किनेरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.२५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले लघुप्रकल्प श्रीवर्धन-रानीवली, कर्जत- साळोख, अवसरे५० ते ७५ टक्के भरलेले लघुप्रकल्पखालापूर -कलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबेपूर्ण क्षमतेने भरून वाहणारे लघुप्रकल्पमुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे-सुतारवाडी, पेण- आंबेघर, सुधागड- कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर - भिलवले२५ ते ५० टक्के भरलेले लघुप्रकल्पअलिबाग- श्रीगाव, सुधागड- ढोकशेत, श्रीवर्धन- कार्ले, पनवेल - बामणोली, उरण- पुनाडे७५ टक्केपेक्षा अधिक भरलेले लघुप्रकल्पसुधागड- घोटवडे, श्रीवर्धन - कुडकी, पनवेल- उसरण