Join us

जलवाहिनी दुरुस्तीमुळे दाेन दिवस पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

मुंबई : गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथील जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात ...

मुंबई : गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथील जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दादर, प्रभादेवी, माहीममध्ये पाणी येणार नाही. तर सातरस्ता, धोबीघाट परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

--------------------

अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई : मुंबई ते ठाणे शहरास जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला ते घाटकोपर दरम्यान रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहूतक विभागाने अशा अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

.................................