Join us

भायखळा व दक्षिण मध्य मुंबईत आज पाणीबाणी

By admin | Updated: June 14, 2016 03:19 IST

तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात येत आहे़ या काळात भायखळा व दक्षिण मध्य मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही़

मुंबई: तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात येत आहे़ या काळात भायखळा व दक्षिण मध्य मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही़ १५ जूनला नायर रूग्णालय, बीडीडी, एलफिस्टन, लोअर परळ, महालक्ष्मी, धोबीघाट सातरस्ता, भायखळा येथे पाणी येणार नाही. या वेळेत पाणी नाही : १५ जून सकाळी ८ ते १६ जून सकाळी ८ : नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल, कस्तुरबा रुग्णालय, ना़ म़ जोशी मार्ग बीडीडी चाळ दु़ २ ते ३, प्रभादेवी जनता कॉलनी, आदर्श नगर, एलफिस्टन, लोअर परऴदुपारी ४ ते सायं. ७, सायं. ७ ते रात्री १० : एलफिस्टन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, वीर सावकर रोड, एल़जे़रोड, सयानी रोड, भवानी शंकर रोड, सेना भवन परिसर, मोरी रोड, टी़एच़ कटियार मार्ग, कापड बाजार, माहिम, माटुंगा, दादर पश्चिमेकडील विभाग़१६ जूनला पाणीपुरवठा नाही : सकाळी ४ ते संध्याकाळी ७बीडीडी चाळ, ना़ म़ जोशी मार्ग सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग