Join us

पाणीसंकट टळले, कपात होणार रद्द!

By admin | Updated: August 6, 2014 03:24 IST

मुंबईकरांसाठी एक खूशखबर असून, आता त्यांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत़

मुंबई : मुंबईकरांसाठी एक खूशखबर असून, आता त्यांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत़ तर मोठे तलावही काठोकाठ भरल्यामुळे मुंबईवरील पाणीसंकट अखेर टळले आह़े त्यामुळे उर्वरित 1क् टक्के पाणीकपातही उद्यापासून रद्द होणार आह़े याबाबतची घोषणा उद्या स्थायी समितीच्या बैठकीत होणार आह़े
तुळशी, मोडक सागर आणि तानसा तलावानंतर अप्पर वैतरणा व विहार तलावही भरण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे यंदा मध्य वैतरणा तलावाचा जादा जलसाठाही मुंबईला वापरता येणार आह़े त्यामुळे महिन्याभरापूर्वी 2क् टक्के पाणीकपातीचा सामना करणा:या मुंबईकरांना पुढील वर्षीर्पयत मुबलक पाणी मिळणार आह़े
मुंबईला दररोज 3 हजार 75क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतो़ वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये 13 लाख दशलक्ष लीटर जलसाठा आवश्यक आह़े त्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे 2 जुलैपासून मुंबईत 2क् टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती़ 
मात्र, पावसानेच जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात मेहेरबानी केल्यामुळे पाणीप्रश्न मिटला आह़े त्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रशासनाने 1क् टक्के पाणीकपात मागे घेतली होती़ उर्वरित कपात उद्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे घेण्यात येईल, असा दिलासा आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिला आह़े (प्रतिनिधी)
 
तलावकमाल आजचा किमान
मोडक सागर163़15163़16143़26
तानसा128़63128़6क्118़87
विहार8क़्1279़3173़92
तुळशी139़17139़31131़क्7
अप्पर वैतरणा6क्3़516क्1़19594़55
भातसा142़क्7133़541क्4़9क्
मध्य वैतरणा285़क्क्277़8क्22क्
 
मराठवाडय़ात मान्सून सक्रिय
पुणो : पावसाळा सुरू झाल्यापासून रुसून बसलेल्या मान्सूनची कृपादृष्टी आता मराठवाडय़ावर झाली आहे. मराठवाडय़ात तो सक्रिय झाल्याने हवालदिल झालेल्या मराठवाडय़ातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.