Join us
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: May 22, 2015 01:10 IST

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्णांमधील ६४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसाविण्यास सुरुवात झाली आहे.

पंकज रोडेकर ल्ल ठाणेमे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्णांमधील ६४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसाविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्णातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे त्या गावांना ठाणे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजित प्रस्ताव आराखड्याने ४८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे.ठाणे जिल्ह्णातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तर पालघरमधील पालघर, वसई,तलासरी, डहाणू हे तालुके सध्यातरी टंचाई मुक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळा संभाव्य पाणी टंचाईचा कृती आराखडा ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. या आराखड्यात एप्रिल आणि जून या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील १४८ गावांत, २६८ पाड्यांमधील तसेच पालघरमधील ७५ गावांत आणि ३६२ पाड्यांमध्ये पाणी टंचाईग्रस्त म्हणून प्रस्तावित केले होते. त्यानुसार मे महिन्यांत ठाण्यात १४८ गावांपैकी २६ तर पालघरमधील ७५ गावांपैकी ३८ गावांमध्ये पाणी टंचाई सुरु झाल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यात पाणी टंचाईने नागरिकांचे कंबरे मोडले आहे. ठाण्यामधील शहापूर तालुक्यातील २० गावांमधील ७४ वाड्यांमध्ये तर मुरबाडमध्ये ६ गावांमधील १३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे पाहण्यास मिळत आहे. ही टंचाई लक्षात घेवून शहापूरात १६ तर मुरबाडमध्ये ४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे चित्र आहे. तेथील २७ गावांतील ४५ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या भेडसावते. येथे १७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ वाड्यातील ५ गावांमधील १५ वाड्यांमध्ये पाणी टंचाई सुरु असल्याने त्यांना ४ टॅकरद्वारे पाणी मिळत आहे. तर विक्रमगडमधील दोन गावातील २६ वाड्यांना टंचाईची झळ बसली आहे.तेथे ५ टँकरद्वारे पाणीची व्यवस्था केली गेली आहे. तसेच जव्हारमध्ये ४ गावांसाठी २ दोन टँकर पाणी पुरवठ्यासाठी दिले गेले आहेत.