ठाणे : अनधिकृत इमारतींसाठी सुरु केलेल्या जलअभय योजनेला प्रतिसाद मिळत असतांनाच ठाणे महापालिकेने अनधिकृत नळजोडणीला अधिकृत करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन वर्षात या योजनेअंतर्गत १० हजार २५० ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत देखील सात कोटी ८४ हजार १४ हजार ९३४ रुपयांचा फायदा झाला आहे.ठाणे शहरात आजही पाणी चोरी,गळतीचे प्रमाण ३० टक्यांच्या आसपास आहे. परंतु मागील काही वर्षात अनधिकृतपणे पाणी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे जे ग्राहक नियमितपणे पाणी आकार भरुन पाण्याचा वापर करीत होते. त्यांना मात्र याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे पालिकेने २०११ मध्ये अनधिकृत नळजोडणी विरोधात मोहीम उघडली होती. परंतु,तरी देखील याचे प्रमाण कमी न झाल्याने पालिकेने अखेर या संदर्भात अनधिकृतपणे नळजोडणी घेऊन पालिकेचे नुकसान करणाऱ्यांच्या विरोधात अभय योजना पुढे आणली. या योजनेच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत ४ हजार ७११ नळजोडण्यांना अभय योजनेत आणले गेले. त्यांच्याकडून ३ कोटी ९० लाख ३७ हजार ६५० रुपयांची वसूली केली. दुसऱ्या वर्षी ४ हजार ७६४ जणांना या योजनेचा लाभ देत ३ कोटी ८२ लाखांची वसूली केली. (प्रतिनिधी)
'जलअभय’चे पालिकेच्या तिजोरीत ७.५ कोटी
By admin | Updated: December 22, 2014 22:27 IST