Join us

जिल्ह्यात १३९६ शाळांमधील वॉटर प्युरिफायर बंद

By admin | Updated: August 17, 2014 22:30 IST

जिल्हा परिषदेचा कारभार : शुध्द पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या १३९६ प्राथमिक शाळांमधील वॉटर प्युरिफायर बंद आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुध्दिकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.दूषित पाणी अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शुध्द पाणी पिण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ग्रामीण भागातील २२२७ प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात आले होते. हे वॉटर प्युरिफायर अकराव्या वित्त आयोगातून लाखो रुपये खर्च करुन खरेदी करण्यात आले होते.प्राथमिक शाळांना वाटप करण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरपैकी १३९६ संयंत्र बंद पडली असून, केवळ ८३१ शाळांमध्ये ही यंत्र सुरु आहेत.बंद असलेल्या वॉटर प्युरिफायरमुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी शुध्द येते, का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच हे बंद असलेले वॉटर प्युरिफायर जिल्हा परिषदेकडून अजूनपर्यंत दुरुस्त का करण्यात आले नाहीत, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर व्ाांर्ताहर)तालुकानिहाय संयंत्रतालुकाबंद वॉटर प्युरिफायरमंडणगड२७दापोली१७९खेड१९७चिपळूण१२५गुहागर ८७संगमेश्वर१४४रत्नागिरी२८८लांजा१८९राजापूर१६०एकूण१३९६