Join us
Daily Top 2Weekly Top 5

वॉचमनकडून महिलेवर हल्ला

By admin | Updated: April 24, 2017 02:45 IST

चार दिवसांपूर्वी सोसायटीत वॉचमन म्हणून कामाला राहिलेल्या तरुणाने, बलात्कारास विरोध केल्याने, एका महिलेवर चाकूने गंभीर वार

मुंबई : चार दिवसांपूर्वी सोसायटीत वॉचमन म्हणून कामाला राहिलेल्या तरुणाने, बलात्कारास विरोध केल्याने, एका महिलेवर चाकूने गंभीर वार केल्याची घटना अंधेरीत घडली. राजा शेबू असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संबंधित महिलेवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजा शेबू हा सोमवारपासून अंधेरीतील एका सोसायटीत वॉचमन म्हणून कामाला होता. फ्लॅटमध्ये आपल्या आईसमवेत राहात असलेल्या एका ३५ वर्षांच्या तरुणीवर त्याची वाईट नजर होती. शुक्रवारी फ्लॅटमध्ये कोणी नसताना, त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ती विरोध करू लागल्यानंतर, त्याचे चाकूने तिच्या पोटावर व हातावर वार केले. रक्तबंबाळ तरुणीच्या आवाजाने शेजाऱ्यांनी धाव घेत, वॉचमनला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)