Join us

साध्या वेशात पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 06:08 IST

अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबई : अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत रोडरोमियो, लुटारूंवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस साध्या वेशात सहभागी असतील.मुंबईतील प्रमुख चौपाट्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच यंदा ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. आतापर्यंत १०३ मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे.५ हजार सीसीटीव्हींच्या मदतीने मुंबईतील प्रत्येक घडामोडीवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबईतील प्रमुख पाच गणपती विसर्जन ठिकाणी वाहतूकपोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून यात प्रामुख्याने गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडी मस्जिद वांद्रे, जुहू चौपाटी आणि गणेश घाट पवई या ठिकाणांचा समावेश केला आहे.गणेशमूर्तीेचे आगमन आणि विसर्जनादरम्यान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारले आहेत. इतकेच नव्हे तर विसर्जनाच्या वेळी वाहने बंद पडल्यास त्यावर तत्काळ कारवाईसाठी पोलीस क्रेन्स, बीएमसी क्रेन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :गणेश विसर्जनगणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८