Join us

मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज

By admin | Updated: February 6, 2017 03:41 IST

घोडपदेव परिसरात रामभाऊ भोगले मार्गालगत असलेल्या, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या मोकळ््या भूखंडावर कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने परिसरात घाण

मुंबई : भायखळ््यातील घोडपदेव परिसरात रामभाऊ भोगले मार्गालगत असलेल्या, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या मोकळ््या भूखंडावर कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने परिसरात घाण आणि रोगराईचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तक्रारकर्ते अशोक भेके यांनी केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. यामागील मुख्य कारण मोकळ््या भूखंडावर जमा झालेला कचरा आहे. या संदर्भात नोव्हेंबर महिन्यापासून मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडे पत्र व्यवहार केल्याचे भेके यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाने डिसेंबर महिन्यात भूखंडावर साफसफाई केल्याचे उत्तर पाठवले. त्यावर भूखंडाची पाहणी केली असता, थातुर-मातुर सफाई केल्याने भूखंडावरील कचरा जैसे थे असल्याचे निदर्शनास आले.मोकळ््या भूखंडासमोरच रहिवाशी इमारत असून, मागील बाजूस झोपडपट्टी आहे. भूखंडाजवळच महापालिकेची शाळा असून, हजारो विद्यार्थ्यांची या ठिकाणी ये-जा असते. त्यामुळे भूखंडाची तत्काळ सफाई करून, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भेके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)