Join us
Daily Top 2Weekly Top 5

विस्टाडोम सफारीमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:11 IST

मुंबई : पारदर्शी छप्पर असलेल्या अत्याधुनिक विस्टाडोम बोगीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मुंबई : पारदर्शी छप्पर असलेल्या अत्याधुनिक विस्टाडोम बोगीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मान्सून आणि नॉन मान्सून काळात विस्टाडोमने लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. विस्टाडोमने मान्सून काळात सुमारे २० लाख आणि नॉन मान्सून काळात सुमारे १४ लाखांची कमाई केली आहे. १८ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ३३ लाख ८४ हजार २२६ रुपयांची कमाई झाल्याने, रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे.चेन्नईच्या इंटिग्रल कोट फॅक्टरी येथे बांधण्यात आलेली विस्टाडोम १८ सप्टेंबरपासून सुरू झाली. १८ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर या मान्सून काळात विस्टाडोम बोगीने अप मार्गावर ८ लाख ९० हजार ५२४ रुपयांची कमाई केली, तर डाउन मार्गावर ११ लाख ७१५ रुपयांची कमाई केली. परिणामी, मान्सून काळात विस्टाडोमला एकूण १९ लाख ९१ हजार २३९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नॉन मान्सून काळात म्हणजेच, १ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १३ लाख ९२ हजार ९८७ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात अप मार्गावर ६ लाख ३३ हजार २७४ रुपये आणि डाउन मार्गावर ७ लाख ५९ हजार ७१३ रुपये एवढे उत्पन्न आहे. संपूर्ण वातानुकूलित असणाºया या कोचमध्ये पारदर्शी काचेच्या विस्तृत खिडक्या आहेत. पर्यटकांना निसर्गसौंदर्य, दरी, घाट यांचे निरीक्षण करण्यासाठी, ‘आॅब्जर्वेशन लाउंज’ची व्यवस्थाही बोगीत करण्यात आली आहे.>अशी आहे विस्टाडोमबोगीत ४० आसनांची आसन व्यवस्था पुशबॅक आणि रोटेड (१८० अंश कोनात फिरणारे) स्वरूपातील आहे.या आसन व्यवस्थेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना या कोचचे विशेष आकर्षण आहे.या बोगीचे दरवाजे स्वयंचलित आहेत.बोगीत जीपीएस यंत्रणा, १२ एलसीडी लाइट, एक लहान आकाराचा फ्रीज, ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर अशा सुविधादेखील आहेत.आधुनिक बनावटीचे स्वच्छ स्वच्छतागृह हेदेखील विस्टाडोमचे वैशिष्ट्य आहे.>कालावधी उत्पन्न१८ सप्टेंबर ते १९,९१,२३९ रुपये३० आॅक्टोबर (मान्सून)१ नोव्हेंबर ते १३,९२,९८७ रुपये१४ नोव्हेंबर (नॉन मान्सून)

टॅग्स :रेल्वे प्रवासीमुंबई