Join us

हमीपत्रच्या कटकटीतून सुटका?

By admin | Updated: July 24, 2014 02:28 IST

लोकलचा नवीन पास काढताना आणि त्याचे नूतनीकरण करताना रेल्वे मंत्रलयाने हमीपत्र प्रवाशांकडून लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : लोकलचा नवीन पास काढताना आणि त्याचे नूतनीकरण करताना रेल्वे मंत्रलयाने हमीपत्र प्रवाशांकडून लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हमीपत्रची कटकट प्रवाशांना होणार असल्याने त्यामधून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हमीपत्रत पासधारकांसाठी बंधनकारक असलेली माहिती रेल्वेच्या टाइमटेबल बुकमध्ये समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. 
एका याचिकेत प्रतिज्ञापत्रबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयानुसार रेल्वे मंत्रलयाने नवीन पास काढताना किंवा पासचे नूतनीकरण करताना प्रवाशांकडून हमीपत्र घेणो बंधनकारक केले आहे. रेल्वे कायद्याचा भंग होणारी कोणतीही कृती मी करणार नसून, असे वर्तन झाल्यास माझा पास कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा आणि नवीन पास दिला जाऊ नये, असे यात नमूद करण्यात आले आहे. यासाठी एक वेगळा अर्जही दिला जाणार आहे. मात्र या निर्णयामुळे तिकीट खिडक्यांसमोर पाससाठी उभ्या  प्रवाशांना मोठय़ा कटकटीला सामोरे जावे लागणार आहे. पश्चिम रेल्वेने तर याबाबत फेरविचार याचिका दाखल करावी, अशी विनंती रेल्वे मंत्रलयाला केली आहे. मात्र मध्य रेल्वेने सावध पवित्र घेत रेल्वे मंत्रलयाच्या निर्णयाला कुठलाही विरोध केलेला नाही. हमीपत्रत प्रवाशांसाठी असलेली बंधनकारक माहिती रेल्वेच्या टाइमटेबलमध्येच समाविष्ट करण्याचा विचार रेल्वेचा असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. यापूर्वीच नवीन पास तसेच पासाच्या आयडीमागे पास हस्तांतरणीय नसल्याचे नमूद असतानाच पास काढताना निवासी पुरावा गरजेचा असल्याचे सांगण्यात आले आहे. हमीपत्रमुळे प्रवाशांना मनस्ताप होणार असून त्या दृष्टीने आम्ही एक वेगळा विचार करीत आहोत. रेल्वे कायद्याचा भंग होणारी कोणतीही कृती प्रवाशांनी करू नये, असे वर्तन झाल्यास पास रद्द करण्यात करण्यात येईल, अशी माहितीच टाइमटेबलमध्ये नमूद केली जाईल, असे निगम यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वेकडून कुठल्याही हमीपत्रसाठी दीड कोटी वेगळ्या फॉर्म्सची छपाई केली जाणार नसल्याचे निगम म्हणाले. (प्रतिनिधी)
 
पश्चिम रेल्वेने रेल्वे मंत्रलयाकडे अलाहाबाद उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचे विनंतीपत्र दिले आहे. त्यावर निर्णय होणो बाकी असून, या निर्णयानंतरच रेल्वेच्या टाइमटेबलमध्ये नवीन नियम समाविष्ट करण्याचा विचार केला जाणार आहे. 
 
हमीपत्रऐवजी रेल्वे कायद्याचा भंग होणारी कोणतीही कृती प्रवाशांनी करू नये, असे वर्तन झाल्यास पास कायमस्वरूपी रद्द करण्यात करण्यात येईल, अशी माहितीच रेल्वेच्या टाइमटेबलमध्ये नमूद केली जाईल, असे निगम यांनी सांगितले.