Join us

मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॉर्मर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 21, 2023 19:43 IST

मशीनद्वारे उपचार होण्यास मदत होणार

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मेळघाटातील सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॅार्मरची कमतरता लक्षात आल्यावर पावसाळयात विशेषत: हायपोथर्मिया मुळे नवजात अर्भक क्रिटीकल होण्याचा संभव असतो , त्याचे शारिरीक तापमान संयमित राहावे व पुढील गुंतागुंत होऊ नये या बाबी लक्षात घेउन त्वरित हे वॅार्मर मशीन गरजेचे आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेत राज्याच्या कपोषण समितीच्या टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांच्या तर्फे अमरावती सिव्हील सर्जन यांना वॅार्मर मशीन सुपूर्द करण्यात  आले. यावेळी समीर शाह, सुभाष मेंगाणे, जय शाह उपस्थित होते.

कुपोषण निर्मूलन समितीच्या टास्क फोर्स समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री महोदयांनी दि,१९ जून रोजी नियुक्ती केली होती.त्यानंतर आपण पालघर,मेळघाटचा  दौरा केला होता. त्यावेळी मेळघाटातील सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॅार्मर ची कमतरता लक्षात आल्यावर आपण वॅार्मर मशीन आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले अशी माहिती त्यांनी दिली.

पावसाळयात थंड तापमान असते. त्यामुळे नवजात शिशू जे कमी वजनाचे अकाली जन्मणारे याना हायमोथर्मिया मुळे दगावण्याचा संभव असतो. याचं वेळी जन्मत: कावीळ ही असते, अशावेळी या मशीनद्वारे उपचार होण्यास मदत होते. यापूर्वी ही सेमाडोह साद्रावाडी चिखलदरा येथे मशीन दिल्या होत्या असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई