Join us  

थंडीची चाहूल; परळमध्ये उबदार कपडे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:17 AM

आॅक्टोबर महिना संपल्यावर मुंबईत थंडीची चाहूल लागते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे या वर्षी थंडी उशिराने येईल असे म्हणणे वागवे ठरणार नाही.

मुंबई : आॅक्टोबर महिना संपल्यावर मुंबईत थंडीची चाहूल लागते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे या वर्षी थंडी उशिराने येईल असे म्हणणे वागवे ठरणार नाही. परळ, दादर, सीएसएमटी आदी मुंबईच्या भागात हिमाचल प्रदेश, तिबेटमधील व्यापारी उबदार कपडे विकण्यासाठी दाखल झाले आहेत. हे उबदार कपडे स्वस्त, उत्तम दर्जा आणि आकर्षक रंगांचे असल्याने मुंबईतील नागरिक या विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत असतात. परळ येथील आंबेडकर मार्गावर विक्रेते आले आहेत. मात्र अद्याप थंडी जाणवत नसल्याने उबदार कपड्यांचा व्यापार मंद गतीने सुरू आहे. तसेच २५ ते ३० टक्क्यांनी व्यापारात घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथावर आकर्षक डिझाईन आणि वेगवेगळ्या रंगांमधील उबदार कपडे घेऊन हे विक्रेते तीन महिने कुटुंबीयांसह येतात. यंदाही हे व्यापारी मोठ्या प्रमाणात या कपड्यांची विक्री करण्यासाठी आले आहेत.थंडीपासून संरक्षण करण्याबरोबर नवीन फॅशनेबल कपडे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. तरुणांसाठी सुपर ड्राय, रिदम, विंटर जॅकेट, चेक्स स्वेटर, पॉकेट स्वेटर, दुचाकी चालवताना वापरले जाणारे बायकर स्वेटर इत्यादी उपलब्ध आहेत. काळ्या, पांढऱ्या आणि खाकी रंगातील हे उबदार कपडे तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत.स्वेटर जॅकेटबरोबरच महिलांसाठी नक्षीकाम केलेल्या शॉल, हातमोजे, मफलर, कानटोपी, कानपट्टी, सॉक्ससह कतरिना, पलक, हिल्स, कॉलर लेडीज स्वेटर, व्ही नेक या कपड्यांना चांगली मागणी आहे. बच्चे कंपनीसाठी अपना टाइम आयेगा, चायना स्वेटरही उपलब्ध आहेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी प्लेन स्वेटर, हाफस्लिव्हचे ब्लाऊजदेखील उपलब्ध आहेत. कलन अ‍ॅकरालिक या मटेरियलपासून बनवलेले स्वेटर म्हैसूर, लडाख, दिल्ली येथून आणले जातात, अशी माहिती कर्नाटकचे रशीद खान यांनी दिली.उबदार कपड्यांच्या किमतीजॅकेट - ८०० ते १०००रिदम - ३०० ते ७००पलक - ४०० ते ६००कतरिना - ७०० पासूनसुपर ड्राय - ४०० पासूनहिल्स - ५०० पासूनअपना टाइम आयेगा - २५० ते ४००शॉल - ३०० ते १०००मफलर - २०० ते ५००

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनमुंबई