मुंबई : भिंत अंगावर कोसळल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मालवणी परिसरात घडली. मात्र पालिकेच्या नाल्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.युवराज एस. असे या मुलाचे नाव आहे. तो मालवणीच्या गेट क्रमांक ७ मध्ये असलेल्या न्यू कलेक्टर कंपाउंडमध्ये पालकांसोबत राहत होता. नाल्यावर असलेल्या एका घराची भिंत बरीच वर्षे दुरुस्ती न झाल्याने जीर्ण झाली होती. युवराज त्याच्या जवळपास खेळत असताना अचानक ती कोसळली आणि तो त्याखाली दबला गेला.
भिंत अंगावर कोसळून चिमुरड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 06:11 IST