Join us
Daily Top 2Weekly Top 5

वॉक हाय हॉटेल जमीनदोस्त

By admin | Updated: February 21, 2016 02:14 IST

लोअर परळ परिसरातील फिनिक्स मॉलसमोर असलेले वॉक हाय हे बेकायदेशीर हॉटेल पालिकेने शनिवारी जमीनदोस्त केले़ सर्वोच्च न्यायालयाने जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतरही हे

मुंबई : लोअर परळ परिसरातील फिनिक्स मॉलसमोर असलेले वॉक हाय हे बेकायदेशीर हॉटेल पालिकेने शनिवारी जमीनदोस्त केले़ सर्वोच्च न्यायालयाने जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतरही हे हॉटेल सुरू होते़ त्यामुळे अखेर दिलेली मुदत संपताच पालिका प्रशासनाने हॉटेलवर कारवाई केली़ सेनापती बापट मार्ग पदपथावरच हे बेकायदेशीर हॉटेल गेली अनेक वर्षे सुरू होते़ या हॉटेल चालकाला पालिकेने अधिनियम ३१४ अंतर्गत नोटीस बजावली होती़ मात्र हॉटेल चालकाने या कारवाईला दिवाणी न्यायालयात आव्हान दिले़ त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले़ तेथेही पालिकेच्या बाजूनेच निकाल लागला़ त्यानुसार हॉटेल चालकाला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली़ या आदेशाचे पालन करून स्वत:हून हॉटेलची जागा रिकामी करणार असल्याचे शपथपत्र हॉटेल चालकाने न्यायालयात सादर केले़ तरी मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी हॉटेल खाली करण्याची कोणतीच हालचाल केली नाही़ त्यामुळे मुदत पूर्ण होताच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)