Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘फिरसे’वरील स्थगिती उठवली

By admin | Updated: July 3, 2015 03:44 IST

कुणाल कोहलीच्या ‘फिरसे’ या आगामी चित्रपटावर लावण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. कोहलीच्या ‘फिरसे’

- कुणाल कोहलीला दिलासा

मुंबई: कुणाल कोहलीच्या ‘फिरसे’ या आगामी चित्रपटावर लावण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. कोहलीच्या ‘फिरसे’ ची कथा आणि आर.एस.व्ही.पी. या चित्रपटाची कथा यामध्ये साम्य असल्याने उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने लावलेली स्थगिती आज न्या. व्ही.एम.कानडे आणि न्या. बी.पी.कुलाबावाला यांनी उठवली. न्यायालयाने दिलासा देताना कोहलीला ५० लाख जमा करण्यास सांगितले आहे. पटकथा लेखिका ज्योती कपूर यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन तसेच ब्रीच आॅफ कॉन्फीडंस या कलमांखाली कोहली आणि बॉम्बे फिल्म कंपनी या प्रॉडक्शन कंपनी विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती.कपूरच्या म्हणण्याप्रमाणे २०१० साली तिने आर. एस. व्ही. पी. सिनेमासाठी एक पटकथा लिहिली होती. तसेच ही पटकथा फिल्म रायटर्स असोसिएशनकडे रजिस्टर केली होती. २०१३ साली कपूर आणि कोहली यांची भेट झाली. कोहलीला ही पटकथा भावली. परंतु काही कारणास्तव दोघांमध्ये करार झाला नाही. त्यानंतर कपूरने दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊससोबत चित्रपटाचा करार केला. (प्रतिनिधी)